‘२५ वर्षांतील दलितांचे स्वातंत्र्य’ : एक वादग्रस्त लेख, त्याची कथा, त्या कथेमागची कथा आणि वाद-विवादाची तोंडओळख
हे पुस्तक वाचताना शोषित, पीडित, दलित समाजाच्या कठोर अभिव्यक्तीकडे कालच्या तुलनेत आज आपण उदारपणे बघतो आहोत की, अनुदारपणे बघतो आहोत, हा प्रश्न विचारणे प्रस्तुत ठरते. या संदर्भात असे दिसते की, संस्कृतीरक्षक, ट्रोलर्सचा सुळसुळाट झालेल्या आजच्या समाजात आपण पिडितांच्या अभिव्यक्तीकडे कालच्या पेक्षा अधिक अनुदारपणे बघत आहोत.......